बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर प्रदर्शित

गेली अनेक वर्षे बॉलिवूडध्ये दमदार कामगिरी करणारी मराठोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मराठोळी असूनही माधुरीने मराठी चित्रपटात काम का केले नाही, याबाबत माधुरीच्या चाहत्यांसोबत अनेकांना उत्सुकता होती. पण, आता ही उत्सुकता संपली असून, माधुरी 'बकेट लिस्ट' नावाच्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
नुकताच 'बकेट लिस्ट'चा टीझरही प्रदर्शित झाला. स्वतः माधुरीने हा टीझर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअरही केला आहे. दरम्यान, संक्रांतीच्या दिवशी या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करून माधुरीने अनेकांची संक्रांत तीळगुळापेक्षाही गोड करून टाकली होती.  
 
आता तर चित्रपटाचे टीझरही लॉन्च झाले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनाउत्सुकता आहे ती चित्रपटाची. अर्थात, चित्रपटातील गाणी अद्याप यायची आहेत. पण, तोपर्यंत तरी टीझरवरच समाधान मानावे लागणार आहे. 'बकेट लिस्ट' हा आपल्या आस्तित्वाचा शोध घेणार्‍या एका सामान्य, मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी असल्याचे सांगितले जात आहे. मध्यवर्गीय स्त्रीची कहाणी सांगणारे तसे बरेचसे चित्रपट मराठीत आले आहेत. पण, आपल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटातून माधुरी काय देणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.