बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (12:34 IST)

रणधीर कपूर यांना कोरोना व्हायरसची लागण, रुग्णालयात दाखल!

बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाने एका वर्षातच दोन लोक गमावले, मागच्या वर्षी ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्याचवेळी यावर्षी 9 फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांचे निधन झाले. चार भाऊ-बहिणींपैकी दोन भावांच्या मृत्यूनंतर रणधीर कपूर आणि त्याची बहीण रीमा जैन आता बाकी आहेत.
 
आता ताज्या बातमीनुसार रणधीर कपूरला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की 74 वर्षीय रणधीरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीविषयी फारशी माहिती समोर आली नाही.
 
दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेच्या वादातूनही कपूर कुटुंब चर्चेत आहे. वास्तविक, रणधीर आणि रीमा जैन यांनी राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील त्यांच्या हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर हायकोर्टाने या दोघांना राजीव कपूरच्या घटस्फोटाची कागदपत्रे आणण्यास सांगितले आहे.