सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

एवढे मानधन घेतो रणवीर

सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून दिल्लीतील उत्साही युकवाची बँड बाजा बारात या चित्रपटात भूमिका साकरणारा रणवीर सिंह ओळखला जातो. अभिनय कौशल्याच्या बळावर रणवीरने या कलाविश्वास शाहरुख, सलमानची स्पर्धा असतानाही स्वत:चा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवले.
 
पद्मावत या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रणवीर त्याच्या कामाप्रती जास्तच समर्पक वृत्तीने लक्ष देता आहे. एका रिपोर्टप्रमाणे या चित्रपटाच्या यशामुळे त्याने मानधनातही वाढ केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. रणवीर यापुढे चित्रपटासाठी कमीत कमी 13 कोटी रुपये मानधन आकारणार आहे. रणवीर याआधी एका चित्रपटासाठी 7 ते 8 कोटी रुपये मानधन घ्यायचा. पण, चित्रपटाला मिळालेले यश आणि आपल्या कामाचा योग्य मोबदला म्हणूनच आता त्याने मानधनाचा आकडा वाढवल्याचे वृत्त आहे.