बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रविना लख्खन च्या रूपात

स्टार प्लस वरील लिप सिंग बॅटल हा आगामी कार्यक्रम लिप सिंक बॅटल या गाजलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा भारतीय अवतार आहे. त्यात केवळ बॉलीवूडमधीलच नव्हे, तर टीव्ही मालिकांतील लोकप्रिय अभिनेते तसेच प्रसिद्ध खेळाडू आणि अन्य क्षेत्रांतील नामवंत व्यक्तीही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या एका भागात अलीकडेच अभिनेत्री रविना टंडन हिन राम-लखन चित्रपटातील अनिल कपूच्या माय नेम इज लख्खन या गाण्यावर लिप सिंकिंग केले. या गाण्यासाठी तिने घेतलेले अनिल कपूर रूप इतके उत्तम होते की प्रेक्षकांना सुरूवातीचा काही काळ कळलेच नाही की ती रविना आहे.
 
अनिल कपूरसारखा दिसणारा कोणी ड्युप्लिकेट नटच या गाण्यात नाच करतो आहे अशी त्यांची समजूत झाली होती. परंतू ती रविना टंडन आहे हे दिसून येताच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला. या गाण्यावर रविना नृत्य करू लागल्यावरच आम्हाला नंतर जाणवलं की हा कलाकार अनिल कपूर नसून रविना टंडन आहे. तिने हुबेहूब अनिल कपूरसारखे कपडे घातले होतेच, पण तिने अनिल कपूरसारख्या मिशा चिकटविल्या होत्या आणि मेकअपही अफलातून केला होता त्यामुळे तिला प्रथम ओळखणं अवघड गेलं.
 
तिचं अनिल कपूरशी खूपच जवळचं साम्य होतं. या गाण्यानंतर तिने अनिकल कपूरची अप्रतिम नक्कल केल्याबद्दल यजमान फरहा खानने रविनाचे आभार मानले. त्यानंतर रविनाने आपली वेशभूषा आणि रंगभूषा उतरवली आणि ती तिच्या मूळ रूपात समोर आली.