1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (18:25 IST)

Director Venugopan Passed Away : मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांचे निधन

RIP
प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वेणुगोपन हे मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराधीन असता त्यांनी 21 जून रोजी अखेरचा श्वास घेतला.

दिग्दर्शक वेणुगोपन यांच्यावर शुक्रवारी रात्री त्यांच्या घराच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिग्दर्शकाच्या निधनाची बातमी अभिनेते अनूप मेनन यांनी दिली आहे. दिग्दर्शकाचा फोटो शेअर करताना, त्याने लिहिले, “गुडबाय वेणू एटा… एक सुंदर आत्मा, एक चांगला मित्र आणि एका चांगला निर्माता.सर्वोपरी  पलक्करण चित्रपटाच्या सेटवर आम्ही त्याच्यासोबत घालवलेले मजेशीर क्षण मला आठवतात. आम्हा सर्वांच्या हृदयात  स्मृतीत  तू कायम राहशील.
 
दिग्दर्शकाच्या निधनामुळे त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
 
दिग्दर्शक वेणुगोपन यांचा शेवटचा चित्रपट 'सर्वोपरी पालकन' 4 ऑगस्ट 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. हा एक कॉमेडी चित्रपट होता जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 'सर्वोपरी  पलक्करण', 'कुसरुथी कुरुप्पू', 'शारजाह टू  शारजाह' असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले होते.

Edited by - Priya Dixit