शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (15:18 IST)

रितेशचा जेनेलियासाठी उखाणा

अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी अलीकडेच इंडस्ट्रीत 20 वर्ष पूर्ण केले. हे 2003 साली तुझे मेरी कसम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता वेड या मराठी सिनेमातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 
 
या दोघांनी आपल्या पहिल्या सिनेमापासून ते आतापर्यंत एकत्र काम करून वीस वर्ष पूर्ण करत नुकतंच सेलिब्रेशन केलं आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात रितेशने जिनिलीयासाठी मराठीत उखाणा देखील घेतला. तर केवळ उखाणाच घेतला नाही तर त्याबरोबरच उखाणा घेण्यामागची एक स्टोरी देखील सांगितली.
 
रितेशने सांगितले की 1995 सालची गोष्ट आहे की मी गावी क्रिकेट खेळायचो आणि त्या भागात क्रिकेटचे सामने ठेवायचो. तेव्हा तिथे पर्सनल कॉमेंटर असायचा आणि दरम्यान त्याचं लग्न होतं. आम्ही देखील त्याच्या लग्नाला गेलो आणि त्या सोहळ्यात फक्त 30 ते 4 जण होते. त्यावेळी त्याला तिथे जो उखाणा घ्यायला सांगितला होता तोच उखाणा मी आज घेणार आहे. अशात उखाणा घेतल्यानंतर मला जज न करता त्याला करा. 
 
रितेश ने हा उखाणा घेतला- भाजीत भाजी मेथीची, जिनिलिया माझ्या प्रीतीची.
 
रितेश - जिनिलियाचा वेड चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. हा सिनेमा जिनिलियाचा पहिलाच मराठी सिनेमा आहे.