बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (08:32 IST)

उर्फिचं समर्थन महिला आयोग करतयं का? चित्रा वाघ

सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फी जे शरीर प्रदर्शन करतेय ते अतिशय बिभत्स आहे. याला महिला आयोग समर्थन करतंय का ? असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला विचारला आहे. भाषा नको तर कृती हवी अशी मागणी ही त्यांनी ट्विट करत केली आहे.
 
ट्विट करत काय म्हणाल्या चित्रा वाघ
माझा विरोध उर्फिला या व्यक्तीला नाही तर तिच्या बिभत्स विकृतीला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. उघडंनागडं सार्वजनिक ठिकाणी फिरणं ही संस्कृती आमची नाही. आम्ही अस बिभत्स वागण खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महिला आयोगाल प्रश्न विचारताना त्या म्हणाल्या की,भर रस्त्यात अर्धनग्न एक महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोग स्वतः याची दखल घेत का नाही? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फी अतिशय बिभत्स शरीरप्रदर्शन करतये @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? असे टॅग करत प्रश्न विचारला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor