1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (08:24 IST)

अर्पिताचा नवरा 'लव्हरात्री'मधून बॉलिवूडमध्ये, सलमान करणार 'लाँच'

salman arpita husband loveratri

सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा 'लव्हरात्री'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करत आहे. सलमानने  ट्वीटमुळे यावर शिक्कामोर्तब केला आहे. 

लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. आयुषसोबत कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सिनेमाचं शूटिंग सुरु होणार असून 2018 च्या अखेरी 'लव्हरात्री' प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.