शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (12:26 IST)

संजय दत्त दुबईला रवाना

संजय दत्त पुन्हा दुबईला रवाना झाला आहे. त्याच्यासोबत असलेल्या सोनू निगमने विमानातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने याची माहिती मिळाली. कोरोना काळातच संजय दत्तला कॅन्सर झाला. मात्र त्याने वेळेवर उपचार घेऊन कॅन्सरवर मात केली. या काळात त्याचे कुटुंब म्हणजे पत्नी मान्यता, दोन्ही मुले दुबईला होती. त्यामुळे काही काळ संजही दुबईला गेला होता. मात्र उपचारासाठी तो पुन्हा मुंबईत आला होता. उपचारानंतर त्याने काही चित्रपटांचे शूटिंगही केले.
 
आणि आता मात्र तो पुन्हा दुबईला कुटुंबासोबत गेला आहे. सोनू निगमही कोरोना काळात दुबईलाच होता. काही कामानिमितत तोसुद्धा मुंबईला आला होता. सोनू निगमने विमानातला  एक व्हिडिओही शेअर केला आहे. यासोबत सोनूने लिहिले आहे, पुन्हा एकदा मी दुबईला जात आहे. माझ्यासोबत आहे शूर संजय भाई आणि त्याची मुले. याशिवाय आमच्यासोबत माझा ड्रायव्हर मुन्ना मुजनाबीनही आहे. संजला आनंदी पाहून मला आनंद होत आहे. या दोघांबरोबरच आमच्यासोबत माझा भाऊ हरीश वासवानीची सासू सोनी हेनानी ही आहे.