बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 4 मार्च 2017 (10:27 IST)

करिनाच्या पार्टीत साराचा बोल्ड अंदाज

सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. करण जोहरच्या आगामी सिनेमातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सध्या बॉलिवूडच्या या नवीन चेहऱ्यांमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती सारा अली खानचीच. करिना कपूर तिला फॅशनचे खास धडे देते म्हटल्यावर सारा सगळ्यांमध्ये उठून दिसणारच ना.
 
करिना कपूर खानच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सारानेही हजेरी लावली होती. साराने काळ्या रंगाचे शर्ट, शॉर्ट पॅन्ट आणि गुडघ्यापर्यंतचे बूट घातले होते. कमीत कमी मेकअप आणि फॅशन करुनही ती सर्वांमध्ये खुलून दिसत होती. करिनाच्या या पार्टीला साराशिवाय करिष्मा कपूर, करिष्माचा कथित प्रियकर संदीप तोष्नीवाल, मलायका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान आणि कुणाल खेमुही उपस्थित होते.