शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (08:30 IST)

अभिनेते सतीश शाह कोरोनामुक्त

बॉलिवूड अभिनेते सतीश शाह यांना देखील करोनाची लागण झाली होती. २० जूनला उपचारासाठी ते लिलावती रुग्णालयात भरती झाले होते. आनंदाची बाब म्हणजे सात दिवसांत त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली. परिणामी २८ जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
 
सतीश शाह यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आजारी असताना आलेला अनुभव सांगितला. “मला काही दिवस वारंवार ताप येत होता. माझ्या शरीराचं तापमान ९९ ते १०० डिग्रीच्या आसपास असायचं. अशा स्थितीत मी काही औषधं घेऊन बरा होण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु माझा ताप काही केल्या जात नव्हता. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी करोना चाचणी केली. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर लगेचच २० तारखेला मी रुग्णालयात भरती झालो. तिथे माझ्यावर योग्य उपचार केले गेले. परिणामी आठच दिवसात मी बरा झालो. आता मी घरी परतलेलो असलो तरी देखील डॉक्टरांनी मला काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे.” असा अनुभव सतीश शाह यांनी सांगितला.