गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (09:20 IST)

‘कबीर सिंग’ ने १३ दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला गाठला

अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट ‘कबीर सिंग’ची बॉक्स ऑफिसवर अजूनही वर्चस्व कायम आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. शाहिद कपूरच्या करिअरमधील २०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १३ दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘कबीर सिंग’ चित्रपटाची एकूण कमाई ट्विटरद्वारे सांगितली आहे. या ट्विटमध्ये ‘कबीर सिंग’ने सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाला कमाईच्या बाबतील मागे टाकल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाने केवळ १३ दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला पार केला आहे तर सलमानच्या ‘भारत’ने १४ दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला पार केला होता. त्या पाठोपाठ ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाने देखील २८ दिवसांमध्ये २०० कोटींची कमाई केल्याचे ट्विटमध्ये सांगितले आहे.