गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (19:24 IST)

Shilpa Shettyने शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल केला, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

shilpa shetty
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे, अलीकडेच शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, शर्लिनने पत्रकार परिषदेत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर आणखी बरेच आरोप केले होते. 
 
शर्लिनच्या या आरोपांविरोधात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 50 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. Pinkvilla मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या वकिलांमार्फत जारी करण्यात आलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे की, शर्लिन चोप्रा यांनी लावलेले आरोप हे खोटे आणि निराधार आहेत. शर्लिनने बदनामी आणि पैशांची उधळपट्टी करण्यासाठी हा आरोप केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.