मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (10:52 IST)

कनिका कपूर रामायणवर भारी, सर्चमध्ये प्रियांकालाही मागे टाकलं

करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश आपल्या घरात असून इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करत आहे. अनेक लोकं सतत ऑनलाइन असतात. अशात गायिका कनिका कपूरने बाजी मारली आहे. जगभरात सर्वात जास्त सर्च केलेली भारतीय सेलिब्रिटी म्हणून कनिका कपूरचं नाव पुढे आलं. 
 
सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या नावांमध्ये कनिका कपूर अग्रणी आहे. आश्चर्य वाटेल पण तिने प्रियांका चोप्रालाही यात मागे टाकलं आहे. याहू इंडियाच्या आकड्यांनुसार कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिचं नाव इंटरनेटवर सर्च करण्यात आलं. 
 
लोकांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. जगभरात कनिका कीवर्ड सर्वाधिक शोधण्यात आला. या शिवाय रामायण देखील सर्वात अधिक सर्च करण्यात आले. 
 
परंतू ‍कनिका टॉपवर राहण्याचे कारण म्हणजे परदेशातून आल्यानंतर कनिकाने शेकडो लोकांना भेटली होती आणि एका आठवड्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते. केलं होतं. करोना व्हायरसमुळेच कनिकाच्या नाव सर्च यादीत सर्वात वर आलं. उपचार घेतल्यानंतर कनिका आता बरी झाली आहे.