गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही, कारण 'हे' आहे

अनेक चित्रपटांमध्ये श्रीमंती किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवण्यासाठी अ‍ॅपलच्या गॅजेट्सचा वापर केला जातो. परंतु हा वापर येत्या काळात थांबवावा लागणार आहे. आता निर्मात्यांना कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही. ‘स्टार वॉर्स: द लास्ट जेडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक वॅनिटी फेअर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली.
 
“अ‍ॅपलचे कुठलेही गॅजेट जर चित्रपटातील खलनायकाने वापरले तर कंपनीची नकारात्मक जाहिरात होऊ शकते. त्यामुळे त्यांना ही ताकिद मिळाली होती. शिवाय येत्या काळात कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलच्या परवानगीशिवाय त्यांचे उत्पादन दाखवता येणार नाही. आणि दाखवल्यास कंपनी कायदेशीर करण्याची शक्यता आहे.” अशी माहिती वॅनिटी फेअर यांनी या मुलाखतीत दिली.