शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (11:12 IST)

सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचे बॉलिवूड मध्ये लवकरच पदार्पण

Superstar Rajinikanth's daughter to make her Bollywood debut soonसुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचे बॉलिवूड मध्ये लवकरच पदार्पण  Bollywood Gossips Marathi News Bollywood Marathi News In Webdunia Marathi
सिने चित्रपट अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत आता साऊथ इंड्रस्टीनंतर आता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या बातम्या येत आहे. ऐश्वर्या साऊथ इंड्रस्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि गायिका आहे. आता ऐश्वर्या हिंदी चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक म्हणून लवकरच पदार्पण करणार आहे. ऐश्वर्या निर्माता मिनू अरोरा सह 'ओ साथी चल' नावाचा प्रेमकथेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. 
 
अभिनेत्रीने एका वेबसाईटशी बोलताना बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या संदर्भात भाष्य केले. अद्याप या चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या माहिती गुपितच आहे. 

ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष्य यांच्या घटस्फोटानंतर ऐश्वर्या चर्चेत होत्या. त्यांनी  लग्नाच्या 18 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचे ठरविले. हे दोघे वेगळे झाल्यानंतर देखील आपल्या मुलांचा सांभाळ दोघे मिळून करत आहे. त्यांनी असे ठरविले होते की जरी ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले असतील तरी ही मुलांचा सांभाळ दोघे मिळून करतील.