बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑक्टोबर 2018 (08:47 IST)

तनुश्री दत्ता लेस्बियन, तिने माझ्यावर बलात्कार केला

तनुश्री दत्ता खोटारडी आहे, ड्रग अ‍ॅडिक्ट आहे, असा आरोप करणार्‍या आयटम गर्ल राखी सावंत हिने पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. तनुश्री दत्ता लेस्बियन आहे आणि तिने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप राखीने केला आहे. 
 
12 वर्षांपूर्वी तनुश्री माझी चांगली मैत्रीण होती. त्यामुळे मी तिच्यासोबत अनेक रेव्ह पार्ट्यांना जात असे. ड्रग्जच्या नशेत तनुश्रीने अनेकदा माझ्यावर बलात्कार केला. माझा हा आरोप खरा असून आपल्याकडे दोन साक्षीदार असल्याचे तिने म्हटले आहे. यापैकी एक साक्षीदार पुरूष असून दुसरी महिला असल्याचे तिने सांगितले. या साक्षीदारांची नावे सांगण्यास तिने नकार दिला. मात्र या साक्षीदारांना कोर्टासमोर हजर करण्यास आपण तयार आहोत, असे तिने आवर्जून सांगितले.