बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘पद्मावती’ च्या निमित्ताने शशी थरुर याचे ट्वीट

सध्या ‘पद्मावती’ वरून जोरदार वाद सुरु आहे. यामध्येच काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्वीट करुन, ‘पद्मावती’ सिनेमापेक्षा राजस्थानातील महिलांच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधलं आहे. 
 
शशी थरुर यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “पद्मावती सिनेमाबद्दलच्या वादामुळे राजस्थानातील महिलांच्या सद्यस्थितीवर लक्ष केंद्रीत करण्याची संधी आहे, ना की सहाव्या शतकातील महाराण्यांच्या स्थितीवर लक्ष केंद्रीत करण्याची. राजस्थानात महिला साक्षरतेचं प्रमाण अतिशय कमी आहे. वास्तिवक, महिलांच्या डोक्यावर पदर असण्याच्या बंधनापेक्षा शिक्षण अतिशय गरजेचं आहे.” असे म्हटले आहे.