मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (16:25 IST)

कार्तिक-जान्हवी यांच्यात दुरावा?

चित्रपटसृष्टीत सतत कोणत्या न कोणत्या स्टार कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा सुरूच असतात. तशाच त्यांच्या नातेसंबंधातील दुराव्याच्या गोष्टीही समोर येतात. अशी एक चर्चा कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांच्याबाबतीत सुरू आहे. कार्तिक आणि जान्हवी या दोघांना अनेकवेळा स्पॉट करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलादेखील या दोघांना गोव्यात एकत्रित सेलिब्रेशन करताना स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर आता दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. परंतु दोघांनी एकमेकांना अनफॉलो का केले यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. 
 
कार्तिक आणि जान्हवीच्या चाहत्यांना वाटते की, त्या दोघांमध्ये दुरावा‍ निर्माण झाल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर दोघेही खूप अॅहक्टिव्ह असतात. आश्चर्याची बाब म्हणजे जान्हवी आणि कार्तिक हे दोस्ताना-2 मध्ये एकत्रित काम करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. पण त्यापूर्वीच दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. या दोघांमधील रिलेशनशिपवर चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगत आहेत.