मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (18:09 IST)

मॉडेलला न्यूड ऑडिशन देण्यास सांगण्यात आले; राज कुंद्राविरोधातील आरोप

राज कुंद्रा पोलिसांच्या गुंडाळ्यात येताच जुना वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याला कमजोर होतान बघत ज्यांच्याशी त्याने गैरवर्तन केले होते ते आता त्याच्यावर थेट हल्ला करत आहे. आता मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका सोनम समोर आली आहे. सागरिकाने सांगितले की तिला राज यांच्या कंपनीकडून वेबसीरीज ऑफर झाली होती. व्हिडिओ कॉलद्वारे ऑडिशन देण्यास सांगण्यात आले होते.
 
इथपर्यंत सर्व सामान्य होतं परंतु जेव्हा तिला व्हिडिओ कॉलवर न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले गेले तेव्हा ती स्तब्ध झाली. सागरिकाच्या म्हणण्यानुसार त्या बाजूला तीन लोक होते. एकाचा चेहरा ती पाहू शकली नाही. दुसरा उमेश कामत होता जो सागरिकाशी बोलत होता. सागरिकाच्या मते तिसरा व्यक्ती राज कुंद्रा होता. उमेशही सतत राजचे नाव घेत होता. त्याचबरोबर तिने हे ही सांगितले की ज्या सर्व साइट्स चालू आहेत त्या राजांच्या मालकीच्या आहेत.
 
सागरिका म्हणते की राज अश्लील चित्रपट बनवतात त्या रॅकेटचा भाग आहेत. त्याला अटक केलीच पाहिजे. सध्या राज 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. राज कुंद्राविरोधात त्यांच्याकडे ठाम पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते भारतातून अश्लील चित्रपट बनवत असत आणि ईमेलद्वारे इंग्लंडला पाठवत असत आणि तेथून ते अ‍ॅपवर अपलोड केले जात होते.