बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जून 2018 (09:10 IST)

हा अभिनेता साकारणार भाई अर्थात सर्वांचे आवडते पु.ल. देशपांडे

आपल्या मराठी माणसाचे सर्वात आवडते असे लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा चित्रपट रूंपात पडद्यावर येणार आहे. तर ही सर्वस्वी अवघड अशी पु. ल. देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर अखेर रसिकांना मिळाले असून, अभिनेता सागर देशमुख हा पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होईल असे चित्र आहे. दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी ‘फाळकेज् फॅक्टरी’या नावाने चित्रपट निर्मितीची केली असून त्यांनी नवी कंपनी सुरू केली आहे.  या बॅनरअंतर्गत महेश मांजरेकर यांनी पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा सांगणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. पु.ल.देशपांडे यांना  ‘भाई म्हणत याच नावाने  भाई.. व्यक्ती की वल्ली’पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत. मात्र पुलंची भूमिका कोण साकारणार, चित्रपटाची कथा कोण लिहिणार, चित्रपटाचे संगीतकार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होते. अखेर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. पडद्यावर पुलंची भूमिका साकारण्याचा बहुमान सागर देशमुखला मिळाला आहे. त्यामुळे सागर फार आनंदात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे.