शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' तील अमिताभ बच्चन यांचा फोटो व्हायरल

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमातील महानायक अमिताभ बच्चन या सिनेमात एका वृद्धाच्या भूमिकेत असल्याचे या व्हायरल फोटोतून दिसत आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या, जाड काचांचा चष्मा, मळकट पगडी आणि डोक्यासह मानेभोवती कपडा, पांढरी दाढी अशा अवस्थेतील लुक आहे. याआधी 
सिनेमाच्या सेटचे  फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र सिनेमातील कुठल्या पात्राचे फोटो आतापर्यंत समोर आले नव्हते.

या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमिर खान, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, पुढील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.