मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 22 मे 2019 (14:18 IST)

म्हणून परिणिती करणार ट्रेनमधून प्रवास

परिणिती चोप्रा 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या रिमेकसाठी जुलैला इंग्लंडला रवाना होणार आहे. या सिनेमात परी घटस्फोटित महिलेच्या भूमिकेत दिसणार असून हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सहभागी असते. हॉलिवूडपटात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणिती साकारणार आहे. दोन महिने परिणिती इंग्लंडमधील खर्‍याखुर्‍या लोकेशन्सवर शूटिंग करणार आहे. परी ट्रेनमधून प्रवास करणार असून प्रवाशांसोबत शूटदेखील करणार आहे. निर्मात्यांना हा चित्रपट अधिक जिवंत आणि वास्तववादी बनवायचा असल्याने असे करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या मूळ कथानकात ट्रेनचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे हा चित्रपट ट्रेनमध्येच चित्रित करण्यात येणार आहे. ट्रेनमधल्या त्या प्रवासादरम्यान परिणितीच्या पात्राने अनुभवलेले रोमांचक क्षण या चित्रपटातून आपल्यासोर येणार आहेत. हे क्षण वास्तववादी दिसण्यासाठी परिणितीला खरोखरच्या ट्रेन्समध्ये सामान्यप्रवाशांसारखा प्रवास करावा लागणार आहे. 'इशकजादे, हसी तो फसी'सारख्या सिनेमातून परिणितीने आपलं कौशल्य दाखवले आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची कथा 2015 साली सर्वाधिक विक्री झालेल्या पॉला हॉकिन्सच्या पुस्तकावर आधारित असून यामध्ये एका घटस्फोटित महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटातील या भूमिकेसाठी एमिलीचे समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. परिणिती चोप्रा नव्या अंदाजात या हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये पाहायला ळिणार आहे.