तारक मेहता का उलटा चष्मा अभिनेता ललित मनचंदा यांची गळफास लावून आत्महत्या
अभिनेता ललित मनचंदा यांनी मेरठ मध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविले.
त्यांचे थोरले बंधू म्हणाले, ललित हे सुमारे 16 वर्षांपूर्वी अभिनेता होण्यासाठी मुंबईला गेले त्यांनी काही मालिकांमध्ये काम केले. मात्र त्यांना कोरोनामुळे काम मिळत नसायचे नंतर ते मेरठ आले आणि त्यांनी काम शोधण्यास सुरु केले तिथेपण त्यांना काम मिळाले नाही. ते आर्थिक संकटाला तोंड देत होते.
रविवारी ते झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. सोमवारी सकाळी कुटुंबीय त्यांना चहा पिण्यासाठी बोलवायला गेले असता त्यांचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले.कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ललित मनचंदा यांच्या पश्चात त्यांची पत्नी तारू मनचंदा मुलगा उज्ज्वलमनचंदा आणि मुलगी श्रेया मनचंदा असा परिवार आहे.
ललित यांनी क्राईम पेट्रोल, इंडियाज मोस्ट वॉन्टेड, मरियम, झांसी की राणी, आणि ये रिश्ता क्या कहलाता है, खिचडी आणि तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये काम केले आहे. अलीकडील प्रोजेक्ट्स मध्ये त्यांची एक वेब सिरीज येणार होती. ज्या साठी ते खूप उत्सुक होते.त्यांच्या निधनाने चाहत्यांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
Edited By - Priya Dixit