गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (13:17 IST)

पत्करलेल्या धोक्याची किंमत चुकवावी लागली

urmila martondkar
रंगीला, दौर आणि जुदाईसारख्या चित्रपटामध्ये अभिनय करून ऊर्मिला मातोंडकर 90च्या दशकातली बॉलिवूडमधली प्रुखम अभिनेत्रींपैकी एक होती. यानंतर ऊर्मिलानं कौन, पिंजर आणि सत्या या चित्रपटांमध्ये चरित्र अभिनय केला. पैसे कमवण्यासाठी मी कोणताही चित्रपट केला नाही. माझ्या अभिनयाची क्षमता पाहण्यासाठी मी वेगवेगळ्या चित्रपटांची निवड केल्याचं ऊर्मिला मातोंडकरनं सांगितलं. एक स्टार असणं म्हणजे आपल्याला पाहिजे तशीच भूमिका करण्याची संधी मिळणं, असं ऊर्मिलाला वाटतं. कलाकार असल्यामुळे आम्ही धोका पत्करतो आणि मी काही आव्हानं स्वीकारली. मी धोके पत्करले आणि याची किंमत मला चुकवावी लागली, अशी कबुली ऊर्मिलानं दिली. 44 वर्षांची ऊर्मिला इरफान खानसोबत ब्लॅकमेल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.