रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकणार

दीपिका आणि रणवीर  ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नची बोलणी केली असून दोघंही थाटामाटात लग्न करणार असल्याचं समजत आहे.
 
‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका आणि रणवीरच्या आई-वडिलांमध्ये लग्नाची बोलणी झाली आहे. त्यामुळे ते यावर्षी लग्नाच्या बेड्यात अडकणार आहे. दीपिका आणि रणवीर कदाचित सप्टेंबर ते डिसेंबर या काळात लग्न करू शकतात. लग्न हिंदू पद्धतीनं होणार आहे. पण लग्नाचं स्थळ मात्र अजूनही ठरलं नाही. कदाचित डेस्टिनेशन वेडिंग करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दीपिका आणि रणवीर रिलेशनशिपविषयी कोणतेही प्रश्न विचारले असता त्या दोघांनीही मोठ्या कौशल्याने या प्रश्नाची उत्तरे देण्यात टाळाटाळ केल्याचे पाहायला मिळाले.