1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानच्या वक्तव्याचा सर्वत्र तीव्र विरोध

bollywood news
सलमान खानने नैराश्याला श्रीमंतांचं दुखणं असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याने नेटिझन्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सलमान खान म्हणाला की, “मी अनेकांना सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाताना पाहतो. पण माझ्याकडे ही इतका वेळ नाही. मी अनेकांना नैराश्येने ग्रासल्याचे पाहिलं आहे. नैराश्येमध्ये ते अतिशय भावूक असतात, दु: खी असतात. पण माझ्याकडे ती सोय नाही. कारण, मी जर माझ्या मनासारखं वागायचं ठरवलं, तर ते माझ्यावरच उलटेल.”
 
सलमान पुढे म्हणाला की, “माझा व्यवसायच आहे की, मला प्रत्येक वेळी चांगलं राहणं गरजेचं असतं. चांगले कपडे परिधान करणं, स्टायलिश अॅक्शन सीन्स आणि रोमन्स करावा लागतो. कधी कधीतर अनेक सौंदर्यवतींसोबत माझ्या अफेअरच्या चर्चा सुरु असतात. तर कधी अचानक कोर्टाची तारीख समोर येऊन ठेपते.”
 
सलमानच्या या वक्तव्याचा सर्वत्र तीव्र विरोध होत आहे.