बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (11:31 IST)

जॅकलिन फर्नांडिस नव्या अवतारात

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने आपला लूक बदलला आहे व त्याची एक झलक अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळाली. सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर काय कनेक्ट राहणार्‍या जॅकलिनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपला नवा लूक प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे, ज्यामध्ये जॅकलिन नवा हेअरकट व सनग्लासेसमध्ये दिसून येत आहे. 
 
जॅकलिनचा हा नवा हेअरकट उन्हाळ्याच्या सीझनसाठी एकद परफेक्ट आहे. सूर्याच्या किरणांमध्ये घेण्यात आलेला जॅकलिनचा हा फोटो खरोखरच खूप लाजवाब आहे. साधे सफेद रंगाचे टी-शर्ट व काळ्या चष्म्याद्वारे जॅकलिन रेस-3 च्या सेटवर स्टंटदरम्यान डोळ्यांना झालेल्या दुखापतीची माहिती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. जॅकलिनचा हा नवा लूक तिच्या जुडवा-2 मधील लूकपेक्षा खूपच वेगळा आहे, ज्यामध्ये जॅकलिन लांब केसांमध्ये दिसून आली होती.