सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 मार्च 2018 (14:37 IST)

बेली डान्स होतोय व्हायरल

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सीझन-9मध्ये सहभागी झालेली स्पर्धक नोरा फतेही एक उत्कृष्ट बेली डान्सर आहे. आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी मॉडेल आणि अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स आणि लव्ह लाइफळे नेहमीच चर्चेत असते. नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये ती जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ समोर आला असून, तिचे डान्स बघून चाहते घायाळ होत आहेत. शिवाय तिच्या डान्सचे कौतुकही केले जात आहे. त्यामुळेच की काय केवळ चारच दिवसांत तिचा हा व्हिडिओ चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बंगळुरू येथे पार पडलेल्या मिस इंडिया फेमिना दीवा अवॉर्डस्‌ 2018 दरम्यानचा आहे. नोरा फतेहीने आपल्या स्टेज परफॉर्मन्स दरम्यानचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे सोलो परफॉर्मन्ससाठी तिने कुठल्याही प्रकारचा सराव केला नव्हता. याविषयी नोराने कॅप्शनमध्ये लिहिले की, म्युझिक ऐकता ऐकता मी परफॉर्मन्स पूर्ण केला. दरम्यान, नोरा फतेही हिला खरी ओळख 'बाहुबली' या चित्रपटातील 'मनोहारी...' या गाण्यामुळे मिळाली. या गाण्यात तिने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे. प्रभाससोबतची तिची केमेस्ट्रिी चांगलीच गाजली होती. तिचा परफॉर्मन्स बघून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.