मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (14:18 IST)

उर्वशी रौतेला जगातील टॉप 10 सुपर मॉडेल्समध्ये सामील

उर्वशी रौतेलाला मोठे यश मिळाले आहे. ग्लॅमर जगप्रसिद्ध इ-वेबसाइट टाईम्स पेजंट्सने तिला जगातील पहिल्या दहा सेक्सीएस्ट सुपर मॉडेलच्या यादीत स्थान दिले आहे. यात इरिना शायक, सारा पिंटो संपाओ अशी सुपर मॉडेल्स आहेत.
उर्वशीचे कौतुक करत म्हटले आहे की ती मिस टीन इंडिया, मिस एशियन सुपरमॉडल इंडिया, इंडियन प्रिन्सेस, मिस क्वीन ऑफ दी इयर इंटरनॅशनल इंडिया, मिस टूरिझम क्वीन ऑफ द इयर इंटरनॅशनल वर्ल्ड अशी अनेक पदके जिंकणारी मॉडेल असल्याचे म्हटले जाते.
 
उर्वशी बॉलीवूडमध्ये बर्‍याच दिवसांपासून सक्रिय आहे, परंतु आतापर्यंत तिला चित्रपटात अपेक्षित यश मिळालेले नाही. परंतु असे दिसते की आता यश तिच्यापासून  फारसे दूर नाही.
अलीकडेच उर्वशीने जिओ स्टुडिओबरोबर तीन मोठे चित्रपट केले आहेत. याशिवाय ती 'ब्लॅक रोज' नावाचा चित्रपटही करत आहे. तमिळ चित्रपटही ती करत आहे. उर्वशी अखेर व्हर्जिन भानुप्रिया नावाच्या चित्रपटात दिसली होती.