Dharma Sangrah

नृत्याने वाढेल तुमचा आत्मविश्वास -शामक दावर

Updated: शनिवार, 24 मार्च 2018 (12:33 IST)
 
आपल्या समाजात अपंग व्यक्ती किंवा अपंग मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. अपंग व्यक्ती हे आधाराव्यतिरिक्त काहीही हालचाल करू शकत नाही. पण शामक यांनी अपंगांची कमजोरी ही त्यांची ताकद बनवली. "विक्ट्री आर्ट फाऊंडेशन" ही नृत्यशाळा खास अपंग मुलांसाठी असून नृत्यातून त्यांचा आत्मविश्वास आणखी दृढ बनवण्यासाठी सुरू करण्यात आली. "विक्ट्री आर्ट फाउंडेशन" मधील व्हीलचेयर वर बसलेली मुले आज डान्स इन्स्ट्रक्टर अर्थात प्रशिक्षक म्हणून याच संस्थेत कार्यरत आहेत. अपंगत्वावर मात करून प्रगतीच्या शिखरावर पोहोचवण्याचे काम "विक्ट्री आर्ट फाऊंडेशन" करते. 
चौकटीबाहेर जाऊन नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा ठेवणारे शामक दावर हे त्यांच्या कामातून आपला हटके अंदाज सर्वांसमोर दाखवत असतात. देशातच नव्हे तर परदेशात त्यांनी आपल्या नृत्यशाळा सुरु ठेवल्या आहेत. या नृत्यशाळेत एकवर्षीय नृत्यशाळा, उन्हाळी सुट्यांमध्ये "समर फंक" तर हिवाळी सुट्ट्यांमध्ये "विंटर फंक" अशा मुलांसाठी खास बॅचचे आयोजन केले जाते. त्याच प्रमाणे लहान आणि तरुणांप्रमाणेच वृद्धांनीसुद्धा आपले शरीर सुदृढ ठेवावे यासाठी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी डान्स क्लासचे आयोजन केले जाते. शामक स्टाईल नृत्याव्यतिरिक्त शामक अनेक वेगळे प्रकारही इथे शिकवतो.  
 
स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपले काम हे जगावेगळे असावे आणि हीच शिकवण शामक दावर त्यांच्या शिकवणीतून देत आहेत. आत्मविश्वास व बळाच्या जिद्दीवर कोणीही व्यक्ती आपले ध्येय साध्य करू शकतो असा आत्मविश्वास या मुलांमध्ये निर्माण करण्यात शामक नक्कीच यशस्वी आहे.

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments