बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (10:09 IST)

काय सांगता, केबीसी मध्ये आता नवे नियम येणार

अभिनेता अमिताभ बच्चन यांचा द्वारे सादर केला जाणारा क्रीडा आधारित रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' आपल्या 12 व्या पर्वात काही नवीन बदल घेऊन आपल्या समोर सादर होणार आहे. आता पर्यंत या शो मध्ये फक्त हॉटसीट वर बसणाऱ्या स्पर्धकांनाच फायदा मिळत होता पण आता या मध्ये असे काही बदल घडवून आणले आहे. ज्यामध्ये स्पर्धकांना ओळखणाऱ्या लोकांना देखील फायदा होऊ शकतो. आणि हा बदल झालेला आहे स्पर्धकाच्या 'फोन अ फ्रेंड' लाईफ लाइन मुळे. 
 
यात स्पर्धक आपल्या मदतीसाठी आपल्या मित्राला किंवा नातलगाला करणाऱ्या कॉल मध्ये अमिताभ यांची आवाजच ऐकत नसून त्यांना बघू देखील शकणार. या पूर्वी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांची फक्त आवाजच ऐकत होते पण यंदाच्या केबीसी च्या या पर्वात अमिताभ यांचा आवाजच ऐकू येणार नसून ते व्हिडिओ मध्ये दिसून सुद्धा येणार.
 
'कौन बनेगा करोडपती' मध्ये खेळाच्या दरम्यान एक असा देखावा असायचा जेव्हा स्पर्धक आपल्या ओळखीच्या माणसाला फोन करीत असे तर इथून अमिताभ बच्चन त्यांना म्हणायचे 'नमस्कार मी अमिताभ बच्चन बोलत आहे."  हे ऐकून समोरच्या च्या आनंदाला सीमाच नसायची. आता या नव्या पर्वात त्या लोकांचा आनंद गगनात मावेना असेच काही होणार आहे. कारण, आता अमिताभ बच्चन लोकांना ऑडियो कॉल न लावता व्हिडिओ कॉल लावणार आहे. आणि त्यांचा अमोर समोर असणार. आणि या नवीन बदलचे नाव आहे 'व्हिडिओ अ फ्रेंड'. 
 
या व्यतिरिक्त स्पर्धकांच्या उर्वरित लाईफ लाइन 50 -50, एक्सपर्ट चा सल्ला या तश्याच राहणार. शोच्या या पर्वात अजून एक बदल करण्यात आले आहे. या पूर्वी स्पर्धकांची निवड करण्यासाठी 10 लोकांना एकत्र बसवून सर्वात वेगानं उत्तर देण्यासाठी सांगितले जात होते. या 10 लोकांपैकी जो सर्वात जलद उत्तर देत होता, तोच केबीसी चा पुढील स्पर्धक असणार. पण नव्या नियमांनुसार या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट स्पर्धेमध्ये आता 10 च्या जागी 8 लोकच भाग घेऊ शकणार. ऑडियन्स पोलची लाईफ लाइन स्पर्धेतून बाद करण्यात आली आहे कारण यंदाच्या पर्वात प्रेक्षकच नसणार. 
 
वास्तविक प्रेक्षकांशी थेट संपर्क साधण्यासाठीच निर्मात्यांनी 'फोन अ फ्रेंड 'ला वगळून 'व्हिडिओ फ्रेंड' पर्याय निवडले आहेत. केबीसीच्या नव्या पर्वाबाबत त्याचे सल्लागार सिद्धार्थ बसू यांनी सांगितले की 'केबीसी यंदा 20 व्या वर्षी पदार्पण करीत आहे. दर वर्षी तो काही न काही आव्हानाचा सामना करीत आहे. आणि सामान्य माणसात एक खास खेळ म्हणून उभारला आहे. एक कारण असे ही आहे की या खेळाला सादरीकरण करणारं एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. ज्यामुळे या खेळाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. आजच्या परिस्थितीला बघून लोकांसमोर हा फार कठीण काळ आहे. परंतु तरी ही, घरात बसून प्रेक्षक हा खेळ बघू शकतात आणि खेळू देखील शकतात आणि मजा घेण्यासह स्वतःला श्रीमंत देखील बनवू शकता. या कार्यक्रमाचे प्रसारण 28 सप्टेंबर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.