1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (12:23 IST)

विद्या बालन पडद्यावर साकारणार आहे मायावतीची भूमिका, लवकरच होईल घोषणा!

vidya balan
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांचा दौर सुरू आहे. बर्‍याच राजनेत्यांच्या जीवनावर चित्रपट तयार होत आहे. मनमोहन सिंह, बाळ ठाकरे, एनटी रामाराव यांच्या बायोपिक रिलीज झाल्या आहे. आता लवकरच पीएम नरेंद्र मोदी आणि जयललिता यांची बायोपिक रिलीज होणार आहे. आणि आता या लिस्टमध्ये एक अजून नाव जुळणार आहे.
 
वृत्त असे आहे की बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांच्या जीवनावर चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटात मायावतीची भूमिकेत बॉलीवूड   एक्ट्रेस विद्या बालन दिसणार आहे. बातमीनुसार मायावती यांच्या जीवनावर तयार होत असलेली बायोपिकवर मेकर्सने काम करणे सुरू केले आहे. या चित्रपटाचे निर्देशन सुभाष कपूर करणार आहे.
 
जेव्हा या चित्रपटाबद्दल निर्देशक सुभाष कपूर यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी या बातमीचा नकार दिला आहे. जर ही बातमी खरी झाली तर हा   विद्या बालनसाठी फार मोठा मोका राहील. वृत्तानुसार, आता फक्त या चित्रपटाबद्दल गोष्टी सुरू आहे. एवढा लवकर या चित्रपटाबद्दल बोलणे योग्य नाही आहे. कदाचित हेच कारण आहे की सुभाष कपूर यांना या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तर त्यांनी नकार दिला आहे.
विद्या बालनबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती एका वेब सिरींजमध्ये व्यस्त आहे. त्यात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. मायावती ह्या भारताच्या राजकारणात मागील अडीच दशकापासून एक मोठ्या ताकदीच्या रूपात दिसत आहे. त्यांनी वेग वेगळ्या टर्ममध्ये उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीच्या स्वरूपात काम केले आहे.