1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (15:30 IST)

शेतकरी पिझ्झा का खाऊ शकत नाही?

farmers
नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान आंदोलन करणारे शेतकरी पिझ्झा खात असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हे फोटोपाहून काही नेटकरी संतापले अन्‌ त्यांनी आंदोलनकर्त्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या टीकाकारांना आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जे शेतकरी गहूची शेती करतात ते गहूपासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाहीत का? असा सवाल तिने विरोधकांना केला आहे. त्यांचे पाय मेहनतीचे प्रतीक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच देशातील जमीन सुपीक बनते. त्यांनादेखील पायांचा मसाज करण्याचा अधिकार आहे. कोण आहेत ते शेतकरंना कायम दरिद्री आणि लाचार परिस्थितीतच पाहायचे आहे? अशा आशयाचे टि्वट करुन स्वराने ट्रोलर्सला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. तिचे हे टि्वट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.