गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (10:02 IST)

शेतकरी आंदोलनावर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पंतप्रधानांना पत्र

देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. शेतकरी आंदोलनाबाबत हे पत्र असून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची या पत्रात मागणी करण्यात आलीय. कायदे मागे न घेतल्यास संविधानिक पदावर असूनही आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्राच्या माध्यमातून दिलाय. 
 
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरलेय. केंद्राने आपल्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी त्यांनी 'भारत बंद' घडवून आणला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शेतकऱ्यांच्या कोअर टीमने भेट घेतली. पण यातही काही तोडगा निघाला नाहीय. देशभरात या आंदोलनाचे पडसाद दिसू लागलेयत. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी पत्र लिहून इशारा दिलाय.