नाणार जमीन विक्रीची चौकशी करा, विधानसभा अध्यक्षांनी दिले चौकशीचे निर्देश
रत्नागिरीतील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प परिसरात कवडीमोल किमतीत खरेदी करण्यात आलेल्या जमीन विक्रीची रत्नागिरी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीला या खरेदी-विक्री व्यावहाच्या चौकशी करण्याचे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. हा चौकशी अहवाल महिन्याभरात सादर करण्याच्या सूचनाही पटोले यांनी दिल्या आहेत. नाणारच्या कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दीर्घकाळ बैठक पार पडल्यावर विधानसभा अध्यक्षांनी चौकशीचे हे निर्देश दिले.
प्रकल्पाची घोषणा होताना नाणार बाहेरील व्यक्तींनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या. प्रकल्प रद्द झाला पण हे व्यवहार तसेच ठेवण्यात आले असल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनात आणून देत या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी केली.