राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नोंदणी सुरु

Last Modified शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)
महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात एनटीएस स्पर्धेच्या आगामी परीक्षेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ८ ऑक्टोबरपासून परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर २०२० रोजी होणार असून राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १३ जून २०२१ रोजी होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषेदेने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. इयत्ता १०वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्कासह ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन विषय मिळून २०० गुणांची परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, कन्नड व तेलगू अशा सात भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in किंवा //nts.mscescholarshipexam.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन परिषदेने केले आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

विश्वविजेत्या क्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी ...

विश्वविजेत्या क्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली, तो टोकियो ऑलिंपिक खेळू शकणार नाही
पुरुष विभागात, 100 मीटर वर्ल्ड चॅम्पियन क्रिस्टियन कोलमनवर डोपिंग नियंत्रणाशी संबंधित तीन ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम लांबणीवर पडले आहे त्यांची छायाचित्रे लटकवा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा कामावरील विलंब ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या ...

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?
”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण ...

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ...