सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2019 (15:51 IST)

नोकरी करणार्‍यांना मिळू शकतो मोठा दिलासा, इन्कम टॅक्समध्ये सूट सीमा 3 लाख होण्याची उमेद

Budget 2019: केंद्राची मोदी सरकार 5 जुलै रोजी आपल्या दुसर्‍या कार्यकाळाचे पहिले बजेट सादर करणार आहे. न्यूज एजेंसी ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, यंदा नोकरी करणार्‍यांना इन्कम टॅक्समध्ये मोठी सूट मिळू शकते. इन्कम टॅक्स सूट 2.5 लाख रुपयांहून वाढवून 3 लाख रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. एजेंसीचे म्हणणे आहे की अद्याप 
या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे.
 
नोकरी करणार्‍यांना मिळू शकतो दिलासा - अंतरिम अर्थसंकल्पात 5 लाखापर्यंतची इन्कमवर फुल सूट देऊन सरकारने टॅक्सपेयर्सला मोठा दिलासा दिला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टानुसार, सरकार हा फायदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून सर्व टॅक्सपेयर्सला देऊ शकते. अशी अपेक्षा आहे की सरकार 3 लाख रुपयांपर्यंत टॅक्सेबल इन्कमची मर्यादा वाढवू शकते. तुम्हाला सांगायचे म्हणजे 10 लाखावर 30 टक्क्यांवर स्लॅब 2012च्या बजेटपासून बदलण्यात आलेला नाही आहे.