1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (09:57 IST)

JEE Mains साठी 75 टक्के गुणाच्या अटीतून सूट

JEE Mains 2021
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने JEE Mains 2021 मध्ये सामील होणार्‍या 12 वीत 75 टक्के गुण असल्याची सक्ती हटवली आहे. शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी 12वीत 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट दिली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
 
त्यांनी ट्विट करत म्हटले की आयआयटी जेईई (एडवांस्ड) आणि मागील अकादमिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता बारावीमध्ये किमान 75 टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. 
 
केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले की या वर्षी जेईई मेन आणि नीट परीक्षा सिलेबस मागील वर्षासारखा राहील. त्यात बदल होणार नाही. निशंक यांनी म्हटले की विविध शिक्षण बोर्डांकडून सल्ला घेऊन एनटीएने निर्णय घेतला आहे की विद्यार्थ्यांना 90 प्रश्नांपैकी केवळ 75 प्रश्न सोडवावे लागतील. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मैथेमेटिक्स या प्रत्येक विषयातून 25 प्रश्नांचे उत्तर देण्याचा पर्याय दिला जाई,. 15 वैकल्पिक प्रश्न असतील आणि पर्यायी प्रश्नांमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणार.