मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (07:54 IST)

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ ते २१ मे दरम्यान ऑनलाईन आयोजन

मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ मे २०२१ ते २१ मे २०२१ या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत.
 
यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन ॲप्लाय केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स (Skype, Whatsapp, etc.) व्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे. रोजगार इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा ॲड्रॉईड मोबाईल धारकांनी प्ले स्टोअरमधून महास्वयंम (mahaswayam) ॲप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉग-इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.