1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मार्च 2022 (08:24 IST)

राज्य कर निरीक्षक पद मुख्य परीक्षा -२०१९ चा निकाल जाहीर

Results of State Tax Inspector Post Main Examination-2019 announced
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षा -२०१९ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे, तर सहायक मोटार वाहन निरीक्षक – २०२० परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक या संवर्गातील ३५ पदांकरीता मुख्य परीक्षा- २०१९ घेण्यात आली होती, या परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे. त्याशिवाय आयोगामार्फत नोव्हेंबर, २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक २०२० ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. ३ एप्रिल, २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ९२१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८ हजार २३६ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ मधून उद्योग संचालनालयात उद्योग निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक, विमा संचालनालयात तांत्रिक सहायक तसेच कर सहायक, लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) या गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये गैरव्यवहार व अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आयोगातर्फे प्रत्येक जिल्हा केंद्रासाठी शासन सेवेतील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.