शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (15:38 IST)

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त टिप्स

exam
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) 12 फेब्रुवारी रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे. 
 
यासाठी काही खास टिपा-
 
स्टूडेंट्सने शालेय पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक वाचावी.
अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिका टाइमर लावून सोडवाव्यात.
अभ्यासक्रमातील कठिण वाटत असलेले भाग अधिकाधिक रिव्हाइज करावे.
परीक्षा देताना प्रश्न काळजीपूर्वक वाचावे.
प्रश्न काळजीपूर्वक सोडवावे.
प्रश्न सोडविल्यानंतर लगेच त्याचे उत्तर उत्तरपुस्तिकेत अचूक नोंदवावे.
उत्तरपुस्तिकेत वर्तुळे रंगविण्यासाठी बॉलपेन वापरावा.
उत्तर गोल व्यवस्थित रंगवावे.
अवघड वाटत असलेले प्रश्न शेवटी सोडवावे.
उत्तर देताना प्रश्न क्रमांक आणि उत्तरसूचीत दिलेला क्रमांक योग्य आहे की नाही तपासावे.