मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By वेबदुनिया|

संगीत हेच माझे दैवत- सोनू निगम

- भीका शर्मा

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या सुपरहिट गाण्यामधून आपली ओळख करून दिली आहे. सोनूचे अलीकडेच तीन अल्बम बाजारात आले आहेत. त्याच्या एकूणच कारकिर्दीसंदर्भात त्याच्याशी मारलेल्या या गप्पा...


प्रश्न : आपण पार्श्वगायन कमी केले होते, काय हे खरे आहे काय?
होय, हे खरे आहे. गेल्या वर्षभरात असे घडले खरे. गेल्या वर्षी मी अमेरिकेत वर्ल्डवाइड टूरवर होतो. अमेरिकेतच माझ्या मुलाने जन्म घेतला. तिथेच इतर कामात मी व्यस्त होतो. गेल्या एक वर्षापासून मी भारतात आहे. 'रब ने बना दी जोडी' व 'राज' या चित्रपटांमध्ये माझी गाणी होती. आगामी काळातही काही गाणे येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत कमी कामे मी करतोय. कुटुंबासाठी मी जास्त वेळ देतोय.


प्रश्न : रियलिटी शोच्या माध्यमातून तयार होणार्‍या गायक-गायिकांना अल्बमच्या क्षेत्रात किती संधी आहे?
हल्लीच्या काळात खासगी अल्बम चालत नाहीत. परंतु, गेल्या वर्षी मी तीन व माझ्या वडिलानी पाच वर्षांत चार अल्बम काढले. ते सुपरहिट झाले आहेत. नवोदित गायक स्वत:चे अल्बम काढू शकतात. कुठल्याही गोष्टीला चांगले मांडले तर ती लोकांना आवडते. याचा मला चांगला अनुभव आहे. कुठलेही काम जीव ओतून केले तर त्याला हमखास यश हे मिळतेच. आपल्या कामावर आपण नेहमी प्रेम केले पाहिजे. संगीतावर माझे जीवापाड प्रेम आहे. चित्रपट संगीत, गजल, भजन, कव्वाली किंवा सूफी संगीताकडे नवदित गायकाना लक्ष द्यावे लागेल, तरच संगीत क्षेत्रासह देशाचा विकास होईल, असे मला वाटते.

प्रश्न : संगीतासंदर्भात सध्या तुम्ही काय करत आहात?
संगीत हे माझे दैवत असून मी प्रत्येक क्षणाला त्याची पूजा करत असतो. मी एकदा गायकांची संघटना तयार करण्याची योजना केली होती. मात्र, ती काही कारणास्तव होऊ शकली नाही. गेल्या वर्षी माझे 'क्लासिकली माइल', 'रफी री सरेक्टेड' व 'महा कनेक्शन' हे तीन अल्बम आले. मला स्वतं‍त्र काम करायला आवडते. संगीत चित्रपटाचे एक अंग आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये नायक व नायिकांना प्राधान्य दिले जाते. मात्र, भारताबाहेर गायक-गायिका, नायक-नायिका व खेळाडू यांना सगळ्याना समान स्थान आहे. कोणातच भेदभाव केला जात नाही. भारतात संगीत क्षेत्राची उपेक्षा होते. त्यामुळे या संगीताला सन्मान देण्यासाठी काम करतोय.

प्रश्न : संगीतविषयक एखादे पुस्तक लिहिण्याचा तुमचा विचार आहे काय?
होय नक्कीच. मी याबाबत खूप विचार केला असून भविष्यात मी संगीत क्षेत्राला योगदान ठरणारे पुस्तक लिहिणार आहे. परंतु, कामाचा एवढा व्याप आहे की, लिहायला वेळच मिळत नाही. पुस्तक लिहिण्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे. मला दीड वर्षाचा मुलगा आहे. सध्या मी त्यालाच पूर्ण वेळ देऊ शकत नाही. परंतु, भविष्यात पुस्तक लिहिणार हे नक्की.

प्रश्न : तलत अझीझ यांच्याबरोबर आपला अल्बम आला आहे. त्यांच्याविषयी काय वाटते?
तलतजी व मी मिळून एक गझल अल्बम काढला आहे. त्यात माझी केवळ एकच गझल आहे. तलतजी माझे आवडते गायक आहे. सेलीब्रिटीपेक्षा आपण एक चांगली व्यक्ती असायला पाहिजे, असे मला वाटतं. तलतजींचा खूप स्वभाव चांगला आहे. मला अशा लोकासोबत काम करायला आवडते.