शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

कैरीचे चटपटीत लोणचे

साहित्य : 2 किलो कैर्‍या, 100 ग्रॅम शोप, 50 ग्रॅम हळद, 75 ग्रॅम तिखट, 100 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम मीठ, 5 ग्रॅम हिंग, अर्धा किलो तेल.
 
कृती - कैर्‍या पाण्याचे चांगल्या धुऊन पुसून सुकवून घ्यावी. त्या कैरीचे शेवटचे टोक सोडून दोन भागात कापावी आणि कोय फेकून द्यावी. शोप अर्धवट कुटून घ्यावी. हळद, तिखट, मीठ, हिंग यांना दळावे. मेथी बारीक करावी. त्यानंतर 200 ग्रॅम तेल स्टीलच्या पातेल्यात टाकावे. त्यात सर्व मसाला चांगल्याप्रकारे मिळवावा. मग एक-एक कैरी घेऊन त्यात मसाला भरावा आणि काचेच्या बरणीत किंवा मातीच्या भांड्यात ठेवत जावे. त्यानंतर बरणीला 8 दिवस उन्हात ठेवावे. त्यानंतर बाकी उरलेले तेल लोणच्यावर टाकावे. एक आठवड्यानंतर लोणचे वापरण्यात घेऊ शकता.