साहित्य:- बारीक चिरलेला कांदा १ वाटी, ताजे गोड दही १ वाटी, साखर १ चमचा, धुवून बारीक चिरलेली कोथिबीर २ चमचे, हिरवी मिरची तुकडे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ. कृती:- बाऊलमध्ये सर्व साहित्य एकत्र कालवा. झाकून फ्रिजमध्ये गार करायला ठेवा. या कोशिबीरीमुळे जेवण छान लज्जतदार होते. टीप:- या कोशिबीरीत आवडत असल्यास थोडे अनारदाणे, बारीक द्राक्षे किवा काजूचे तुकडे, ओल्या नारळाचे काप घातल्यास कोशिबीर अधिकच चवदार होते.