शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (08:45 IST)

कफ सिरप कोणत्या वयाच्या मुलांना देणं सुरक्षित आहे?

Syrup
- सुशीला सिंह
अडीच वर्षांच्या मुलाला कफ सिरप दिल्यानंतर पुढची 20 मिनिटं त्या मुलाची नाडी बंद झाल्याचं धक्कादायक प्रकरण मुंबईत समोर आलं आहे.
 
मुंबईतल्या केईएम रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मुकेश अग्रवाल यांनी सांगितलं की, "जे प्रकरण समोर आलं आहे त्यामध्ये लहान मुलाला किती प्रमाणात कफ सिरप देण्यात आले ते स्पष्टपणे समजलेलं नाही. हा चोकिंगचा प्रकार वाटतो आहे. लहान मुलांना झोपताना दूध पाजू नये असं म्हणलं जातं".
 
मुलाची आजी डॉ. तिलोत्तमा मंगेशीकर यांनी बीबीसीला सांगितलं की, "15 डिसेंबरला मुलाच्या आईने त्याला औषध दिलं. तेव्हा तो आईजवळच होता. तुझ्याकडे येतो असं नातवाने सांगितलं. तेव्हा अचानकच त्याची नाडी कमी होऊ लागली. तेवढ्यात त्याच्या आईने हाक मारली. मी दुसऱ्या खोलीत होते."
 
डॉ. तिलोत्तमा मंगेशकर भूलतज्ज्ञ आहेत. शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला भूल दिली जाते. त्यांनी पुढे सांगितलं, "नातू अगदी गोरापान होता, पण त्याची त्वचा पिवळी होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. नंतर निळा होऊ लागला. आम्ही नातवाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहोचलो. मी नातवाला सीपीआर द्यायला सुरुवात केली. सात आठ मिनिटात त्याचा रंग गुलाबी होऊ लागला. 17 मिनिटानंतर त्याला शुद्ध आली. त्याने डोळे उघडले आणि श्वास घेऊ लागला".
 
आम्ही काय झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, नातवाबरोबर आधी कधी असं घडलं नव्हतं. कफ सिरप नेमकं कुठलं ते पाहिलं. त्यामध्ये क्लोरफेनेरमाइन आणि डेक्सट्रोमेथोर्फेन होतं. अमेरिकेत चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे कफ सिरप देण्यावर प्रतिबंध आहे.
 
त्यांनी पुढे सांगितलं, "औषधकर्त्यांनी त्यावर यासंदर्भात काहीही लिहिलेलं नव्हतं. त्याचवेळी बालरोगतज्ज्ञ मुलांसाठी हे औषध मुलांसाठी लिहून देत आहेत. मी घरी होते. मी वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत आहे. त्यामुळे नातवाची तब्येत ढासळतेय म्हटल्यावर तातडीने काही करू शकले. मी याविषयी लोकांना सांगू इच्छिते कारण बाकीचे आईवडील जागृत होतील. बालरोगतज्ज्ञांनीही यासंदर्भात काळजी घ्यावी".
 
डॉ. मुकेश अग्रवाल यांनी बीबीसीला सांगितलं, पाच वर्षांच्या मुलांमध्ये आईकडून मिळालेली रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊ लागते. त्याची स्वत: रोगप्रतिकारकक्षमता विकसित झालेली नसते. या वयात व्हायरल तसंच अलर्जी होणं सामान्य आहे.
 
त्यांच्यानुसार या वयाच्या मुलांना एका वर्षात पाच ते सहा वेळा रेस्पिरेटरी अटॅक होतो. दोन तीन दिवसात मुलं बरी होतात. पण हे संक्रमण कान किंवा शरीराच्या अन्य भागात पसरलं तर मुलांना अँटीबायोटिक द्यावे लागतात. सर्वसामान्यपणे मुलांना आपोआप बरं वाटतं. अशा परिस्थितीत औषधाची आवश्यकता नसते.
 
कफ सिरपची आवश्यकता काय?
डॉक्टरांच्या मते लहान मुलांना खोकला होणं बरं असतं कारण शरीरात तयार झालेला कफ त्याद्वारे बाहेर पडतो. खोकला शरीरातून कीटाणूंना बाहेर काढतो. अशा वेळी औषध घेऊन त्याला नियंत्रित करण्याची काय आवश्यकता? लहान मुलांना तीन दिवसांनंतर बरं वाटतं. त्यानंतर एक दोन दिवसात खोकलाही जातो. पण यानंतरही त्रास सुरुच राहिला तर आईवडिलांनी मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जावं. अलर्जीचा त्रास असेल तर त्यावर उपचार सुरू करता येतात. डॉक्टरांच्या मते क्लोरफेनेरमाइनऔर आणि डेक्सट्रोमेथोर्फेन यांचा मुलांवर दुष्परिणाम होऊ शकतो.
 
कफ सिरपचा शरीरावर काय परिणाम होतो?
डॉ. मुकेश अग्रवाल यांनी सांगितलं, कफ सिरपमुळे मुलांना झोप येते. अशा परिस्थितीत मुलांनी जे खाल्लं आहे ते श्वासनलिकेत अडकतं. तो खोकत नाही त्यामुळे अडकलेल्या गोष्टी बाहेरही पडू शकत नाहीत. अशावेळी मुलांना चोकिंगचा त्रास होऊ शकतो.
 
ही औषधं घेतली तर झोप येऊ लागते. रक्तदाब कमी होऊ शकतो. मुलाला सर्दी खोकल्यामुळे आधीच श्वास घ्यायला त्रास होत होता. औषधाने श्वास घेण्यावर परिणाम होतो. मुलाच्या शरीरात ऑक्सिनज कमी होऊ लागतो.
 
अशा औषधांचा ओव्हरडोस झाला तर अडचणी वाढू शकतात.
 
नॅशनल सेंटर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मुलगा दिवसाला सरासरी 11 वेळा खोकतो. थंडीत याची वारंवारता वाढते.
 
सर्दीखोकल्याचं औषध मेडिकलमध्ये मिळतं. पण दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दीखोकल्याची औषध देऊ नये. कारण यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
 
सर्दी आणि खोकल्याची औषधं तयार करणाऱ्या कंपन्या स्वत:हूनच औषधाच्या बाटलीवर लिहितात की चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे औषध देण्यात येऊ नये.
 
नवजात अर्भकं आणि लहान मुलांची सर्दी कमी करण्याचे उपाय
अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या फूड अँड ड्रग्ज अडमिनिस्ट्रेशन (एफडीए)मते सर्दी पडशाचा मुलांवर गंभीर परिणाम होत नाही. पण आईवडिलांसाठी हे काळजीचं कारण होतं.
 
अनेक मुलांना आपोआप बरं वाटतं. औषध सर्दी पडसं लवकर बरी होण्यासाठी कारणीभूत नसतं. सर्दी झाल्याचं मुख्य लक्षण खोकला आहे. शरीरातला कफ बाहेर काढण्यासाठी आणि फुप्फुसांच्या रक्षणाचं काम करतो.
 
औषध घ्यायचं नसेल तर गरम आणि हलके पदार्थ खाऊन घशाला बरं वाटू शकतं.
 
सलाईन नोज ड्रॉप किंवा स्प्रे नाक हलकं राहावं यासाठी मदत करू शकतं.
 
मुलाला सहजपणे श्वास घेता यावा आणि नाकात श्लेषमल द्रव जमा होऊ नये यासाठी कूल मिस्ट ह्यूमिडीफायर वापरण्याचा सल्ला दिला जातो.
 
ह्यूमिडीफायर गरम असायला नको. तसं असेल तर नाकाला सूज येऊ शकते. यामुळे मुलाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते थंड असायला हवं. एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना बल्ब सीरिंजचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लहान मुलांना मध, आलं आणि निंबू एकत्र करून देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही महिन्यांपूर्वी आफ्रिका खंडातील गांबिया या देशात भारतात तयार झालेल्या कफ सीरपमुळे 60हून अधिक मुलांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरानुसार जे सँपल पाठवण्यात आले ते मानकानुसारच होते. जागतिक आरोग्य संघटना आपल्या कारवाईवर ठाम आहे. यासंदर्भात औषधांच्या धोक्याबाबत सूचित करणं हे काम आहे. ते आम्ही करत आहोत असं संघटनेनं म्हटलं आहे