शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By

बाळाच्या आंघोळीसाठी साबण वापरणे कधी सुरू करावे?

नवजात शिशूची त्वचा नाजूक असते. अशा वेळी तुम्हाला बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याच्या त्वचेसाठी कोणते प्रॉडक्ट योग्य आहे आणि कोणते अयोग्य, याचा निर्णय तुम्हाला खूप विचारपूर्वक घ्यावा लागेल. कारण, प्रत्येक कॉस्मेटिक प्रॉडक्टध्ये केमिकल असतात. यामुळे बाळासाठी योग्य प्रॉडक्ट निवडणे आवश्यक आहे.
 
* तुम्ही पहिल्यांदाच बाळाला शॅम्पू किंवा साबणाने आंघोळ घालत आहात. त्या साबणाने बाळाला इजा होईल, अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा एकाच जागी साबण लावा. बाळाची त्वचा लाल पडली किंवा तेथे खाज येऊ लागल्यास तत्काळ साबणाचा वापर थांबवा.
 
* सहा महिन्यांपेक्षा लहान बाळांना साबणाच्या वडीने चोळून आंघोळ घालू नका. साबणआपल्या हाताला लावून मग बाळाला आंघोळ घाला. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर साबणाच्या चोळण्याचे निशाण पडणार नाहीत.
 
* सुगंधुक्त साबणाचा वापर करा. ज्या साबणाला वास येतो, त्यात जास्त केमिकल असतात. त्यामुळे कमी सुगंधाचा, सुगंधुक्त साबणाचा वापर करावा.
 
* बाळाच्या त्वचेला खूप जास्त चोळण्याची गरज नसते. कारण, त्यांच्या त्वचेवर धूळ जमा होत नाही. तुम्ही फक्त मालिश करा आणि आंघोळ घाला.
 
* तीन वर्षांपर्यंतच्या बाळाला बबल्स बाथ देऊ नये. यामुळे त्याच्या मूत्र मार्गात संक्रण होण्याची भीती असते.