गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालदिन
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (14:01 IST)

लहानपण देगा देवा....

लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा..
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानहुनी लहान..
महापूरे झाडे जाती
तेथे लव्हाळ वाचती 
 
अर्थात संत तुकाराम महाराज आपल्या या प्रसिद्ध अभंगात म्हणतात की मुंगी लहान असते पण तिला साखरेचा कण खायला मिळतो तर बलाढय हत्तीला मात्र माहुताच्या अंकुशाचा मार खावा लागतो. अर्थात व्यवहारात ज्यांना मोठेपण असतं त्यांना यातना सहन कराव्या लागतात. तसेच जो कोणी येथे मोठेपण मिरवतो, शेवटी त्याच्या पदरी यातना येतात. त्याउलट जो नम्र आहे, लहानाहूनी लहान त्याच्या नशिबी मात्र आगळेच सुख येते कारण लोक त्याच्या वाट्याला जात नाहीत, त्याला त्रास द्यायचे तर विचारही करत नाही. महाराज म्हणतात की वृक्ष ताठ उभा असतो म्हणून तो महापुरात वाहून जातो मात्र पुरात लव्हाळे वाचतात. माणूस जेवढा मोठा तेवढ्या त्याच्या संवेदना बोथट होतात. म्हणून तुकाराम महाराज देवाला विनंती करतात की मला ह्या संसारात जो सर्वात लहान आहे त्याच्यापेक्षाही लहान बनव.