शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालदिन
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (15:31 IST)

Children’s Day Quotes बालदिन कोट्स

लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा..
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानहुनी लहान..
महापूरे झाडे जाती
तेथे लव्हाळ वाचती 
 
काही गोष्टी अशा असतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाही, यापैकीच एक गोष्ट म्हणजे बालपण…
 
जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. 
 
आम्ही आमच्या मुलांना जीवन जगण्यासाठी घडवतो, पण उलट मुलंच आम्हाला त्यांच्या छोट्या लीलांमधून जीवन काय आहे हे शिकवतात.
 
देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार, आम्ही करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार
 
मुलंही देवाघरची फुलं आनंद पसरवतात आणि सुख देतात. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा आणि नाजूक हातांनी सांभाळा 
 
आपल्या मुलांना फक्त दोन भेटवस्तू द्यावात एक म्हणजे जबाबदारीची मुळं आणि आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्याचे पंख.
 
प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही. 
 
फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, ते सर्वकाही करू शकतात. 
 
बालपण देवा देगा मुंगी साखरेचा रवा
 
आपल्याला चिंता असते की, एका मुलाचं भविष्य काय असेल, पण आपण हे विसरतो की, त्याचा आजही आहे.
 
मुलांना गरज असते प्रेमाची, खासकरून जेव्हा त्यांच्याकडून एखादी चूक होते.
 
मुलं त्यांच्या आईवडिलांकडूनच आनंदी आणि हसायला शिकतात.