शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:17 IST)

राज्यात १० हजार २२६ नवे कोरोनाबाधित आढळले

राज्यात गुरुवारी दिवसभरात १३ हजार ७१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.४ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, राज्यात १० हजार २२६ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहचली आहे.
 
राज्यातील एकूण १५ लाख ६४ हजार ६१५ करोनाबाधितांमध्ये १ लाख ९२ हजार ४५९ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १३ लाख ३० हजार ४८३ जण व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ४१ हजार १९६ जणांच्या संख्येचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सदरची माहिती दिली आहे. 
 
सद्यस्थितीस राज्यात २३ लाख २७ हजार ४९३ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २३ हजार १८३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आतापर्यंत तपासणी झालेल्या ७९ लाख १४ हजार ६५१ नमून्यांपैकी १५ लाख ६४ हजार ६१५ नमूने (१९.७१ टक्के) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.